पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण सिंचन योजनेचे कामे तातडीने सुरू करा.

0

पैठण,दिं.१८:पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कामे तात्काळ सुरू करा; प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

दिड वर्षात लाभ क्षेत्रातील लाभार्थ्यांना पाणी मिळेल असे नियोजन करण्याचे निर्देश

रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. 

   गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे पुढील टप्प्यातील कामे तात्काळ सुरू करावे, या प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,दिड वर्षात लाभ क्षेत्रातील लाभार्थ्यांना पाणी मिळेल असे नियोजन करण्याचे निर्देश असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले.

 मंत्रालयात, मंत्री महोदयांच्या दालनात ब्रह्मगव्हाण  उपसा सिंचन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

 मंत्री भुमरे म्हणाले,  ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना पारंपारिक वितरण व्यवस्था ऐवजी बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणीपुरवठा केल्याने होणाऱ्या बचतीतून  वाढीव 1750 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी खेर्डा ते  पाचोड अशी विस्तारित उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळाली आहे. यामुळे पाचोड परिसरातील दहा गावांच्या शेतीला पाणी मिळणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने  नवीन निविदा काढण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

प्रकल्पाचे कामे सुरू असताना स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाची समस्या निर्माण होऊ नये याकरता कामे सुरू असतानाच योग्य नियोजन करावे .कायमस्वरूपी पक्के कामे करण्याचे नियोजन करण्यात यावे. कॅनॉल वर पूल बांधताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्यात यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

 श्री भुमरे म्हणाले ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना ही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत गोदावरी खोऱ्यातील उर्ध्व गोदावरी खोऱ्यात असून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना आहे व या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी अहोरात्र माझे प्रयत्न राहणार आहेत

. सदर योजना गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात प्रस्तावित आहे. प्रकल्पामुळे सुमारे 65 गावांमधील 20265 हेक्टर शेती क्षेत्राला लाभ मिळणार असून 3205 हेक्टर वरील निर्मिती होऊन कार्यान्वित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

   बैठकीस पाटबंधारे विभागाचे सहसचिव अतुल कपोले, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद कार्यकारी संचालक डॉ संजय बेलसरे,मुख्य अभियंता जलसंपदा विभाग औरंगाबाद विजय घोगरे ,अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ चंद्रशेखर पाटोळे ,कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग क्रमांक 1. धनंजय गोडसे, उपविभागीय अभियंता कैलास साळी, उपविभागागीय अभियंता मनोज वाकचौरे,स्विय्यसहायक गणेश मडके पाटील सह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here