मोहरम मिरवणुक शांतत व उत्साहात पार पाडल्याबद्दल समितीच्यावतीने पोलिस प्रशासनाचा सत्कार

0

नगर -ऐतिहासिक अहमदनगर शहरांमध्ये मोहरम उत्सव शांतता पार पडल्याबद्दल मोहरम उत्सव समितीच्यावतीने पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपाधिक्षक अनिल कातकडे  व एलसीबीचे पीआय दिनेश आहेर व सर्व पोलिस अधिकारी – कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष हाजी करीमशेठ हुंडेकरी, उपाध्यक्ष सय्यद खलील, आय.बी.शहा, सलिम रेडियमवाले, फारूक रंगरेज, सलीम जरीवाला व मोहरम उत्सव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

     अहमदनगर शहरातील मोहरम उत्सव हा ऐतिहासिक असून, त्यास 500 वर्षांची परंपरा आहे. या मोहरम उत्सवात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देातील सर्व समाज बांधव उत्साहाने सामिल होतात. सवारी ज्या भागात स्थापन होते त्या भागात सोयी-सुविधा, उत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसात येणार्‍या भाविकांसाठी व्यवस्था करणे, तसेच रात्रीच्या टेंभे मिरवणुकीत भाविक सवारीवर फुल वाहण्यासाठी व सवारी बरोबर चालणारे टेंभेवर तेल टाकतात. हे टेंभे सवारी बरोबर असतात आदिं विविध कार्यक्रमात प्रशासनाने चांगले सहकार्य केले.

     मोहरमच्या 10 दिवसांच्या कालावधीत पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच मोहरमच्या पार्श्वभुमीवर शांतता समितीची बैठक घेऊन त्यात हा उत्सव चांगल्या पद्धतीने कसा साजरा करता येईल. यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या भावना ऐकून घेतल्या. प्रशासनास येणार्‍या अडचणी नागरिकांच्या सूचनांचा विचार करुन त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. कत्तलची रात्र, मोहरमची मुख्य मिरवणुक मार्गावर पोलिस बंदोबस्त तसेच या मार्गावरील अतिक्रमणे, रस्ते पॅचिंग अशा विविध बारिक-सारिक गोष्टींचा विचार करण्यात आला होता.

     शहरातील विविध भागातून येणार्‍या यंग पार्टीच्या चादर अर्पण करणार्‍या मिरवणुकांसाठी पोलिसांनी बंदोबस्त दिला, त्याचप्रमाणे महाप्रसाद वाटप, चौकाचौकातील विविध कार्यक्रमांनी संबंधित पोलिस स्टेशनच्यावतीने सहकार्य करण्यात आले. हा उत्सव सर्वधर्मिय असल्याने विविध धर्मियांनीही आपआपल्या पद्धतीने या उत्सावास सहकार्य केले.

     मोहरमची मुख्य मिरवणुक वेळेत काढून वेळेत नियोजित ठिकाणी विसर्जत करण्यासाठी मोहरम उत्सव समितीचे पदाधिकारी, यंग पार्टीचे कार्यकर्ते, मनपा, पोलिस प्रशासन यांचे मोठे सहकार्य मिळाल्याने मिरवणुकीस कोणत्याही प्रकारचे गालबोट लागले नाही. आणि शांततेत ही मिरवणुक संपन्न झाली. मोहरमची  ऐतिहासिक महत्व गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात आली. याबद्दल मोहरम समितीच्यावतीने सर्वांचे मन:पुर्वक आभार मानले. तसेच पोलिस प्रशासनानेही मोहरम समितीच्यावतीने केलेल्या सहकार्याबद्दल समितीचे पदाधिकारी व सदस्यांना धन्यवाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here