राजु कोळी , गोपाळ म्हात्रे  भारत श्री पुरस्काराने सन्मानित.

0

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )

आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद महाराष्ट्र, आदर्श मुंबई  व न्यूज 18 महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारत श्री राष्ट्रीय पुरस्काराचे विक्रोळी कनम नगर महाराष्ट्र कामगार भवन येथे आयोजन  केले होते. भारतातून सत्तर जणांना विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्यांना हा राष्ट्रीय भारत श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी केल्याबद्दल राजु गणपत कोळी (पनवेल )-इंडिया प्रेसिडेंट गोशीन रियू कराटे व क्रीडा प्रशिक्षक गोपाळ दिनकर म्हात्रे (सारडे-उरण )यांना भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किशोरी ताई पेडणेकर, कामगार नेते अभिजित राणे ,मेजर मंगेश मोहिते, राष्ट्रपती पदक विजेते सुनील राऊत, आमदार विक्रोळी डॉ पवन अग्रवाल, कल्याणी तपासे,सिने कलाकार डॉ संजय भोईर,नवनाथ कांबळे,अशोक भोईर आदि मान्यवर उपस्थित होते.राजू कोळी, गोपाळ म्हात्रे यांना भारत श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here