सातारा : मानव हा समाजशील प्राणी आहे.आपण समाजाचे देणं लागतो.तेव्हा प्रत्येकांनी समाजासाठी वेळ दिला पाहिजे. कारण,सामाजिक जडणघडणीतूनच भरीव असे कार्य होत असते.असे प्रतिपादन गौतम माने यांनी केले.
तारळे विभाग भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध विकास सेवा संस्था तारळे यांच्या संयुक्त विद्यमाने तारळे येथे माजी केंद्रप्रमुख गौतम माने यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा गौतम माने यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फेटा,शाल,पुष्पहार, पुष्पगुच्छ आदी देऊन भव्य-दिव्य असा सत्कार केला.तेव्हा ते सत्कारास उत्तर देताना संपूर्ण भूतकाळातील इतिहास अनुभवाचे बोल कथन केले.
बाजीराव न्यायनीत म्हणाले, “मानेसाहेब यांनी धार्मिक क्षेत्रात केलेले कार्य भरीव असेच कायम स्मरणात राहील. भारतीय बौद्ध महासभा तारळे विभागाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या धार्मिक कार्यासह शैक्षणिक,सामजीक कामही आदर्शवत असेच होते.”
अनिल वीर म्हणाले, “तारळे भागात सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती,संस्था,संघटना विविध पातळीवर कार्यरत आहेत.तरीसुद्धा विभागात एकोपा हा आढळून येत आहे. यात अनेकांचा सहभाग आढळून येत आहे.मानेद्वयिंनी शासकीय सेवेबरोबरच समाजहितैशी कार्यात ठळकपणे सहभाग घेत असल्याने समाजमन आनंदून जात आहे.तेव्हा ज्येष्ट – कनिष्ठ असा भेद न करता थोरांच्या मार्गदर्शनाखाली ऐक्याची वज्रमुठ कायम अबाधित ठेवावी.तात्विक वाद हा पेल्यातील वादळासारखा असावा.उत्तरोत्तर समाज प्रगतीसाठी कृतीशील कार्य करण्यासाठी ठोस भूमिका घेऊन महापुरुषांच्या विचारावर वाटचाल करावी.नेत्यांचे ऐक्य असेल तर कार्यकर्ते तळ्यात मळ्यात करू शकत नाही.तेव्हा विशालदृष्टिकोण ठेवून सर्व घटकांना सोबत घेऊन केलेले कार्य हे परिपक्व होत असते.”
यावेळी अभिष्टचिंतनपर मनोगत जगधनी आण्णा यांच्यासह म.अंनिसचे किशोर धरपडे, युवा नेते राहुल रोकडे, भानुदास सावंत,गोरख गायकवाड आदींनी व्यक्त केली. दिव्यांच्या रोषणाईत केक कापून आतिषबाजी करण्यात आली. मान्यवरांनी सत्काराचा वर्षाव करून अभिष्टचिंतनपरही जल्लोषात वर्षाव केला. मुख्याध्यापक सुनील माने यांनी संपूर्ण कार्यक्रमाची कमांड स्वतःच एक हाती घेतली होती. त्यांनी आयोजनासह सूत्रसंचालन,आभारप्रदर्शन केले. शेवटी त्यांनीच आशीर्वाद ढाब्यावर मिष्टान्न भोजन देऊन समारोपही केला.रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने मुसळधार वर्षावासाने झाल्याने मानेसाहेबांची साठी कायम स्मरणात राहील.सदरच्या कार्यक्रमास मधुकर जगधनी, शंकर भिसे, रामचंद्र गायकवाड, राजु सावंत, धनाजी कांबळे, मधुकर भिसे संचालक तारळे वि.का.स.सोसायटीचे संचालक मधुकर भिसे,आनंदा भंडारे बौध्दाचार्य विजय भंडारे (बांबवडे) व आनंदा भंडारे, आप्पासाहेब भंडारे,राजदिप कांबळे,ओमकार सावंत, जयवंत वरनारायन, भिमराव सप्रे,गोरख गायकवाड आदी विगातील कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : गौतम माने यांचा अभिष्टचिंतनपर सत्कार करताना मान्यवर.