पोहेगांव ( वार्ताहर) : कायदेशीर साक्षरता व्हावी, तळागाळातील जनतेला न्यायव्यवस्था समजावी कायदा सर्वांसाठी सारखा आहे आर्थिक दृष्ट्या असक्षम असलेल्या लोकांना देखील न्याय मिळण्यासाठी सरकारी वकील दिले जातात. न्याय कोणालाच नाकारल्या जात नाही. फक्त विनाकारण वाद विवाद करून न्यायालयात केसेस दाखल करण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. लोकांची मानसिकता बघून गावातील प्रतिष्ठित नागरिकांना बरोबर घेत अनेक वर्ष प्रलंबित असलेले न्यायालयातील दावे खटले तडजोडीने मिटवता येतात असे प्रतिपादन कोपरगाव न्यायालयाचे अतिरिक्त दंडाधिकारी न्यायाधीश महेश शिलार यांनी केले.ते कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथेराष्ट्रीय लोकन्यायालयात नागरिकांना प्रबोधन करताना बोलत होते.तालुका विधी सेवा समिती , वकील संघ कोपरगाव व देर्डे कोऱ्हाळे ग्रामपंचायत त्यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालय व फिरते न्यायालय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर लोकन्यायालयाचे आयोजन देर्डे कोऱ्हाळे परिसरातील देर्डे चांदवड, मढी बुद्रुक ,मढी खुर्द आदी परिसरातील नागरिकांसाठी करण्यात आले होते.
यावेळी न्या. महेश शिलार , कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष एम पी येवले, कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुणराव येवले, ॲड ए.एल.वहाडणे, ॲड ए डी टुपके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुशारे, मोरे कॉन्स्टेबल ,ॲड रणजीत जावळे, ॲड सागर नगरकर, ॲड सुजय होन , संरपंंच श्रीमती नंदा दळवी,उपसरपंच आशाताई डुबे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब डुबे , निलेश डुबे , कचराबाई पवार , अनिल शिलेदार, नंदा शिन्दें, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दामोधर डुबे,माजी संरपच योगिराज देशमुख, देर्ङेचांदवडचे सरपंच प्रतिभाताई गायकवाड, मढी खु सरपंच सुनिल भागवत, ग्रामसेवक नेवगे. ग्रामसेवक योगेश देशमुख , श्री राठोड ग्रामसेवक, भाऊसाहेब डुबे,राजेद्र गवळी,वंसतराव डुबे,राजेश डुबे,बाळासाहेब शिन्दें.राजेश डुबे,ज्ञानेश्वर देशमुख ,भगवान डुबे,गणेश डुबे,बाळासाहेब डुबे शांताराम डुबे,बबनराव होन ,बाळासाहेब होन, संदिप डुबे,अण्णासाहेब कोल्हे,चंद्रभान डुबे,प्रशांत विघे अदी उपस्थित होते. वकील संघाचे अध्यक्ष ॲड मनोहर येवले व ॲड अशोक टुपके यांनी लोकन्यायालयाचा हेतू विशद करताना सांगितले की प्रामुख्याने कोर्टातील दावे विनाकारण एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा ईरशे पोटी लावून धरले जातात.भारत महासत्ता बनण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. न्यायव्यवस्था 1865 पासून कार्यरत असून न्यायाधीश ज्ञानदानाचे काम करतात. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या विनाकारण न्यायालयात प्रलंबित असलेले दाव्यांची संख्या लक्षात आली तेव्हा त्यांनी लोकन्यायालय व फिरते न्यायालय सुरू करून न्याय आपल्या दारी ही संकल्पना अमलात आणून तडजोडीने व चर्चेने भांडणे मिटवले जाऊ शकतात हे सिद्ध केले आहे.काल या फिरते न्यायालयाचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुणराव येवले यांनी मानले.