आदिवासी शाळेत चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

0

पोहेगांव ( वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे महाराष्ट्र शासन अनुदानित आदिवासी आश्रम शाळा आहे. त्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची विचारपूस करत आपुलकीने चांदेकसारे ग्रामपंचायतचे पदाधिकारी ‌सरपंच किरण होन उपसरपंच सचिन होन आदिवासी आश्रम शाळेला भेट देत विविध सूचना केल्या.

त्यावेळी रावसाहेब होन, प्रल्हाद होन, आदिवासी आश्रम शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक ज्ञानेश्वर होन,माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री पावडे ,श्री गायकवाड,श्री मखिजा, वाघूले ,श्री डोंगरे,श्री अहिरे ,श्री खरात , श्री लेंडे ,श्रीमती भोये ,श्री आचारी ,श्री पोकळे अदी सह शिक्षकेतर कर्मचारी वस्तीगृह कर्मचारी उपस्थित होते . यावेळी सरपंच किरण होन आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर नवनिर्वाचित मुख्याध्यापक ज्ञानेश्वर होन यांचा चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार केला. तर प्रल्हाद होन यांनी आपली आदिवासी आश्रम शाळा इतर शाळेच्या बाबतीत चांगली असून शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच संस्कृती जोपासण्याचे काम करावे असे आवाहन केले.शाळेत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील शिक्षकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.आश्रम शाळेच्या वतीने देखील ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर होन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here