गणेश माने वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील भात पिकाच्या अंतर मशागतीच्या शेती कामाला चांगलाच वेग आला आहे प्रामुख्याने भात पिकाच्या रोप लागण केलेल्या शेतीच्या कामाला मोठ्या प्रमाणात पावसाने उघडी दिल्याने वेग आला आहे
शिराळा तालुका हा सांगली जिल्हाताली मिनी कोकणा बरोबर भात पिकाचे आगार म्हणून समजला जाणारा तालुका त्यातच चांदोली परिसरात दरवर्षी पावसाचे प्रमाण सरासरी तीन ते साडेतीन हजार इतके असल्याने भात शेतीला पोषक असे वातावरण येथे असते
चांदोली परिसरात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला भात तरव्याची पेरणी केली जाते व जुलैच्या सुरवातीला रोप लागण केली जाते
यंदा मात्र जुन महिना पावसाअभावी कोराडा गेल्याने व पाऊस उशीरा सुरु सुरवात केल्याने रोप लागणीस वेळ जरी झाला असला तरी आता पावसाने उघडीप दिल्याने भात पिकाच्या अंतरगत मशागतीला वेग आला आहे जुलै महिण्यात चांगलाच पाऊस झाल्याने शिवार हिरवागार झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे मात्र यावर्षी तणाचे प्रमाण जास्त असल्याने शेतकरी तण काढण्यात मग्न आहे त्याच बरोबर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कटीक नाशकाची फवारणी सुरु आहे व रासायनिक खतांचा डोस देण्यात शेतकरी वर्ग व्यस्त असल्याचे चित्र शिराळा तालुक्या बरोबर चांदोली परिसरात पहावयास मिळत आहे