कोपरगांव :- दि. २० ऑक्टोंबर २०२२
बुधवारी मध्यरात्री कोपरगांव शहरासह संपुर्ण मतदार संघात मुसळधार अतिवृष्टी झाली त्यात टाकळी रोडलगत काही कांदा व्यापा-यांनी शेतक-यांचा कांदा खरेदी केला होता मात्र अचानक आलेल्या पाण्यामुळे या शेडमधील बहुतांष व्यापा-यांदा कांदा पाण्यात वाहुन गेला त्यामुळे या व्यापा-यांवर मोठी नामुष्की ओढवली आहे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी गुरूवारी सकाळी पाहणी करून अचानक आलेल्या संकटात या सर्व कांदा व्यापा-यांना धीर दिला, झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी तहसिलदार विजय बोरूडे व प्रशासकीय पातळीवर माहिती दिली आहे.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, बुधवारी मध्यरात्री वीजेच्या कडकडाटासह पावणेदोन वाजता सुरू झालेला पाउस पहाटे पाच वाजता थांबला. अतिवृष्टीमुळे मध्यरात्री आलेल्या पाण्यामुळे काहीच कळले नाही, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. नैसर्गीक अतिवृष्टीचे संकट भयावह आहे. यापुर्वी एव्हढया मोठया प्रमाणांत पाउस कोसळला नाही. वीजेचा कडकडाट प्रचंड होता त्या तांडवाच्या आवाजाने कोपरगांव पंचक्रोशीत भितीचे वातावरण तयार झाले होते. या व्यापा-यांचे कधीही भरून न येणार हे नुकसान असुन त्यांना धीर देवुन प्रशासकीय पातळीवर या संकटाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे, संजीवनी आपत्ती व्यवस्थापन केंद्रामार्फत मदतकार्य सुरू आहे असेही ते म्हणाले.
टाकळी रोडवरील या व्यापा-यांना गेल्या दोन वर्षापुर्वी झालेल्या अतिवृष्टीचाही तडाखा बसला होता, त्यावेळी मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा वाहून गेला होता. आता पुन्हा या कांदा व्यापा-यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतक-यांकडुन खरेदी केलेला कांदा मातीमोल झाला. अति पाण्यामुळे साठवणुक केलेला कांदा सडला आहे. शेतक-यांना कांद्याचे पैसे कसे द्यायचे अशी चिंता आता या व्यापा-यांना सतावु लागली आहे तर काहींनी स्वतःचे पैसे उपलब्ध करून शेतक-यांना पटटी दिली मात्र त्यांचा कांदा वाहुन गेल्यांने तोटा झाला आहे. ऐन दिवाळीत या संकटामुळे व्यापा-यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
फोटोओळी-कोपरगांव
बुधवारी मध्यरात्री ढगफुटीसदृष्य अतिवृष्टी झाल्यांने टाकळी रोडलगत कांदा व्यापा-यांचा सर्व कांदा पाण्याच्या लोंढयात वाहुन गेला त्यात प्रचंड नुकसान झाले त्याची पाहणी संजीवनी उद्यो समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली.