जेऊर कुंभारी परिसरात पिके जमीन दोस्त
कोपरगाव – कोपरगाव व राहता तालुका आवर्षण प्रवर्षण असल्याने ब्रिटिशांनी धारणा व गंगापूर धरणाची निर्मिती करून या भागाला पाणी आणले मात्र सनन्यायी वाटप कायदा झाल्यानंतर या परिसराची शेती पिके पाटबंधारे खात्याच्या नियोजनावर स्वावलंबुन राहीली आहे. सध्या जेऊर कुंभारी परिसरातील सर्व शेती पिके कोमाजुन गेले असातच गोदावरी उजव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनातून जर हरिसन ब्रँच चारी व इतर चाऱ्यांना पाटबंधारे विभागाने तात्काळ आवर्तन सोडले तर रब्बीची पिके वाचतील . ज्या शेतकऱ्यांना चाऱ्यांचे पानी मिळणार नाही अशा शेतकऱ्यांची पिके जमीन दोस्त झाले आहे त्या पिकांचाही तात्काळ पंचनामा प्रशासनाने केला पाहिजे. तात्काळ चालू आवर्तनतुन शेतीला पाणी मिळाले पाहिजे अशी मागणी कोपरगाव तालुका सरपंच महासंघाचे अध्यक्ष जालिंदर चव्हाण यांनी केली आहे.
चालु पावसाळी हंगामात गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने डोळे वाटारल्याने शेतक-यांकडील पशुधनाला प्यायला पाणी नाही नाशिक इगतपुरी घोटी भागात पावसाचे पर्जन्यमान ब-यापैकी आहे त्यामुळे दारणा गंगापुर धरणे ८० टक्क्याच्यावर भरली आहेत गोदावरी कालव्यांना नागरिकांना तसेच जनावरांचे पिण्यांसाठी पाणी सोडावे अशी मागणी माजी आ स्नेहलताताई कोल्हे यांनी मंत्रालयीन स्तरावर केल्याने गोदावरी कालव्याना पाटबंधारे विभागाने पाणी सोडले. युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील शेतकऱ्यांच्या या अति महत्त्वाच्या विषयात हात घातला असून पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता वहात गोदावरी कालव्यातून तात्काळ शेतीला पाणी मिळण्यासाठी चाऱ्या व उपचाऱ्या सोडाव्या यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मागणी अर्ज सात नंबर फार्म भरण्याची तयारी देखील शेतकऱ्यांची सुरू आहे मात्र मागणी अर्ज भरल्यानंतर पाटबंधारे विभाग जर शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय घेत असेल तर आता जेऊर कुंभारी चांदेकसारे डाऊच खुर्द कोकमठाण परिसरात असलेली सर्व पिके जळून जातील ही वास्तुस्थिती आहे.
जनावरांना पिण्यांसाठी पाण्याची मोठया प्रमाणांत गरज भासते, शेतक-याकडील पशुधन अडचणींत आले आहे तेंव्हा या सगळया गोष्टींचा शासनाने व जलसंपदा विभागाने प्राधान्याने विचार करून तात्काळ गोदावरी उजव्या कालव्यातुन चाऱ्यांद्वारे पाणी सोडावे . या परिसरात शेतकऱ्यांनी सोयाबीन मका ऊस भाजीपाला टोमॅटो अदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या परिसराला कॅलिफोर्निया म्हणून संबोधले होते . आता मात्र वाट पाहण्याची झालेली वाताहत व पावसाच्या लहरीपणामुळे हा भाग पूर्ण जिरायती झाला आहे. शेतकऱ्यांनी शेती पिके उभे करण्यासाठी दागिने गहाण ठेवत तर उसनवारी किंवा बँकेचे कर्ज घेत शेती पिके उभे केले मात्र गोदावरी कालवा वाहत असताना देखील पाटबंधारे विभाग सात नंबर फार्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर पाणी सोडत असेल तर हे पाणी मिळेपर्यंत शेतकऱ्यांची पिके वाचतील का असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. जेऊर कुंभारी परिसरातील पिकांना जीवदान द्यायचेच असेल तर तात्काळ हरिसन ब्रँच चारीसह इतर चाऱ्या सोडाव्या अशी मागणी जालिंदर चव्हाण यांनी केली आहे.