आवरे येथे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न

0

उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )

आत्माराम ठाकूर मिशन संचलित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे, ता. उरण, जि. रायगड व नेहरू युवा केंद्र अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आवरे येथे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा भोलानाथ मंदिर आवरे येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे उदघाटन गाव अध्यक्ष संजय गावंड यांनी केले सोबत सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड व संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर उपस्थित होते. विलास गावंड यांचे सुपुत्र वरद गावंड यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले.

राजीव गांधी जेव्हा भारताचे पंतप्रधान होते तेव्हा संगणकीय करण्याचे काम प्रथम गांधी यांनी केले. तसेच प्रत्येक जिल्हात नेहरू युवा केंद्राची स्थापना व नवोदय विद्यालय सुरु केले. नवोदय विद्यालयामुळे आज गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहे.  आंध्रप्रदेश राज्यात राजीव गांधी नगर बसविले व सर्व गरीब लोकांना त्याच्या काळात घरे दिली. तसेच राजीव गांधी यांचा जन्म दिवस हा सदभावना दिवस म्हणून साजरा केला जातो असे विचार संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर यांनी व्यक्त केले. यावेळी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्थावना प्राजक्ता नाईक यांनी केली व आभार प्रदर्शन स्वराली भोईर यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन निकिता म्हात्रे यांनी केले. यावेळी शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्षा शुभांगी पाटील व सदस्य सुवर्णा ठाकूर, प्रणाली पाटील, प्रितम वर्तक व प्रदीप वर्तक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here