देशाच्या रक्षकांना राखी बांधण्याची संधी मिळणे हे भारतीय सिंधू सभेचे अहो भाग्यच – दामोदर बठेजा

0

भारतीय सिंधू सभेच्या वतीने सैनिकी अधिकार्‍यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

     नगर – देशाच्या रक्षकांना रक्षा बांधून भारतीय सिंधू सभेने रक्षाबंधन साजरे केले आहे. विविध उपक्रमांनी  भारतीय सिंधू सभा दरवर्षी रक्षाबंधन साजरे करत आहे. पोलीस अधिकारी, बस ड्रायव्हर व कंडक्टर, रेल्वेचे टीसी व ड्रायव्हर तसेच पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना याआधी राख्या बांधल्या आहेत. देशाच्या सीमांवर अहोरात्र हे सैनिक तैनात आहेत म्हणूनच आपणही निश्चित आहोत. देशाच्या रक्षकांना रक्षाबंधन करण्यची संधी मिळणे हे भारतीय सिंधू सभेचे अहोभाग्यच, असे प्रतिपादन भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष दामोदर बठेजा यांनी केले.

     भारतीय सिंधू सभेच्या महिला सदस्यांनी ड्राईम अ‍ॅण्ड मेंटेनन्स रेजिमेंट येथे कार्यरत असलेल्या सैनिक बांधवांना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी केली. यावेळी दामोदर बठेजा बोलत होते. यावेळी कर्नल तरुण कौशिक, लेफ्टनंट ऑनरी विजय सिंग, सैनिकी अधिकारी तसेच भारतीय सिंधू सभेचे शहराध्यक्ष रमेश कुकरेजा, उपाध्यक्ष अशोक अहुजा, सचिव जितेश सचदेव, सागर बठेजा, राहुल बजाज, दामोदर माखीजा, जय रंगलानी व महिला सदस्या उपस्थित होते. यावेळी तिरंगा ध्वज हातात घेऊन भारतमातेचा जयजयकार करण्यात आला.

     आभार मानताना वंदना नारंग म्हणल्या, सैनिकांमध्ये असलेली शिस्त जर आपण सर्वांनी आत्मसात केली तर आपले शहर व देश खूप सुधरेल. सर्व सैनिक बांधव कायम आपले संरक्षणाचे कर्त्यव्य पार पडताच असतात. आज राखी पौर्णिमेनिमित्त सैनिकांना राखी बांधण्याचे भाग्य आम्हला मिळाले आहे.

     प्रास्ताविकात जयराम खूबचंदानी यांनी भारतीय संधू सभेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी तानिया वाधवानी, गुंजन पंजवानी, नम्रता कुकरेजा, दीपिका सचदेव, दीपा अहुजा, हेमा लालवाणी, सुनीता रामानी, विनिता रंगलानी, श्रुती हर्द्वानी, शगुन हर्दवाणी, विधी सचदेव, लेहेर बठेजा, निकिता बठेजा, जुही माखीजा, लता भागावनी, वर्षा मद्यान, रुचिता रामाणी, निकिता रंगलानी, अंकिता खूपचंदानी, प्रीशा बजाज, विनिता बजाज, दीपा रोहीडा, अनिता मोटवानी, मीरा दर्डा, शोभा अहुजा, प्रीती कुकरेजा, हर्षा कुकरेजा, भारती असनानी, दिशा असनानी, विनिता मेहतानी, नुपूर मेहतानी, विनिता तलरेजा, निकिता कराचीवाला, नम्रता कुकरेजा, दृष्टी लालवाणी आदी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here