जामखेड तालुका प्रतिनिधी – लाँड्री आणि धोबी यांच्या सेवेसाठी सवलतीच्या दरात वीज देण्याचा निर्णय तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०१८ मध्ये राज्य सरकारने घेतला होता या निर्णयामुळे लाँड्री सेवा देणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंलबजावली झाली नसल्याने अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज सर्व भाषिक महासंघाच्या वतीने वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रशांत खांडेकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले
राज्य परीट धोबी समाज सर्व भाषिक महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष डी डी सोनटक्के यांनी धोबी तसेच लाँड्री सर्व्हिसेससाठी कमी दर आकारण्यात यावे यासाठी सातत्याने पाठपुरवठा केल्याने सन २०१८ मध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धोबी तसेच लाँड्री सर्व्हिसेससाठी विजेचे दर व्यावसायिक दरांपेक्षा कमी करून दरामध्ये ४७ टक्के सवलत देण्यात आली तसा आदेश जारी केला होता मात्र अहमदनगर जिल्ह्यात समाजाने अनेक वेळा निवेदन देऊनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते त्याअनुषंगाने दि २८ रोजी उत्तर महाराष्ट्र युवा विभाग अध्यक्ष संतोष वाघ,जिल्हाध्यक्ष अध्यक्ष विठ्ठलराव रंधे यांच्या प्रमुख उपस्थित वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रशांत खांडेकर यांची भेट घेऊन शासननिर्णयाप्रमाणे जिल्ह्यात धोबी तसेच लाँड्री सर्व्हिसेससाठी विजेचे दर व्यावसायिक दरांपेक्षा कमी करण्याची मागणी करण्यात आली यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी खांडेकर यांनी लवकरच पूर्ण जिल्ह्यामध्ये वीजदर सवलत लागू करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले यावेळी नगर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी प्रसिद्धीप्रमुख अर्जुन दळवी बारा बलुतेदाराची जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड व महासंघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते