सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या संयोजकपदी सुनील काटकर

0

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप संयोजक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी जिल्हा परिषद शिक्षण समितीचे माजी सभापती सुनील काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
खासदार उदयनराजे भोसले यांचे सुनील काटकर हे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात. काटकर यांचे संघटन कौशल्यही उत्कृष्ट आहे. उदयनराजे यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील संघटन कौशल्याची जबाबदारी काटकर यांच्याकडेच असते. संघटन कौशल्य, बेरजेचे राजकारण करण्याची हातोटी आणि जनसंपर्क यामुळे भाजपने त्यांच्यावर सातारा लोकसभा मतदारसंघाची संयोजकपदाची जबाबदारी सोपवली आहे.

लोकसभा मतदारसंघाचे संयोजक म्हणून काटकर काम पाहणार आहेत. याशिवाय भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटकर यांचे अभिनंदन केले. तर नियुक्तीपत्र प्रदान करताना खासदार उदयनराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुशांत निंबाळकर, संग्राम बर्गे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, बाळासाहेब खरात, ॲड. शैलेश संकपाळ, अमोल सणस, ॲड. विनीत पाटील, ॲड. विकास पवार आफी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here