सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय

0

आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता.

1. कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

2. आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो.

3. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते.

4. आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता.

5. आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

6. पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते.

7. योगा केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मिठ मिसळून घ्या. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिजम चांगले राहाते आणि सोबतच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते.

8. वजन कमी करायचे असल्यास स्वत:ला पहाटे पायी चालण्याची सवय लावा यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

9 रात्री उशिरा जेवन केल्याने पोटावरील चरबी वाढते . त्यामुळे रात्री झोपण्याच्या २ तासाआधी जेवा.

10. रात्रीचं जेवणा मध्ये हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार जेवण करू नका. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका. यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here