कोपरगाव दि. ४ सप्टेंबर २०२३
राज्यात सहकारी साखर कारखानदारीत नावाजलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मनेष दिनकरराव गाडे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अहमदनगरचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) डॉ. प्रविण एच. लोखंडे यांनी काम पाहिले.
मनेष गाडे यांच्या नावाची सुचना संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी केली तर त्यास मावळते उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी अनुमोदन दिले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नवनिर्वाचित व मावळत्या उपाध्यक्षांचा सत्कार केला. ही निवडणुक बिनविरोध पार पाडण्यासाठी सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून लेखापरिक्षक भाउसाहेब सोनवणे यांनी सहकार्य केले.प्रारंभी संचालक विश्वासराव महाले यांनी प्रास्तविक केले.
बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, ग्रामिण अर्थकारणाचा पाया मजबुत करण्यांसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील तंत्रज्ञानाचा अभ्यास करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा नावलौकीक वाढविला. शेतकरी, सभासद, ज्येष्ठ, श्रेष्ठ आदि ज्ञात अज्ञात घटकांच्या सहकार्याने पंचवार्षीक निवडणुक बिनविरोध होवुन सर्वप्रथम मागासवर्गीय घटकाचा सन्मान करून रमेश दादा घोडेराव यांना उपाध्यक्षपदी संधी दिली त्याचे त्यांनी सोने करून यशस्वीपणे कारकिर्द सांभाळली. नवनिर्वाचित उपाध्यक्ष मनेष गाडे यांच्या खांद्यावर आता ही जबाबदारी आली असुन ते ही त्यात निपूण होतील असा विश्वास व्यक्त केला.
सत्कारास उत्तर देतांना मावळते उपाध्यक्ष रमेश घोडेराव म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे, राज्य साखर संघाचे संचालक, युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी नेहमीच मागासवर्गीय घटकांना न्याय देत सहकारात नावाजलेल्या कोल्हे कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर टाकली ती प्रामाणिकपणे पार पाडली, त्यात सर्व संचालकांसह पार्लमेंट्री बोर्डाने सहकार्य दिले त्यांचे आपण ऋणी आहोत. नवनिर्वाचित उपाध्यक्ष मनेष गाडे म्हणाले की, सभासद, शेतक-यासह, युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी उपाध्यक्षपदी संधी देत जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवुन, त्याचा नावलौकीक वाढविण्यासाठी जीव तोडुन काम करू.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. त्र्यंबकराव सरोदे, रमेश आभाळे, निलेश देवकर, विलासराव वाबळे, ज्ञानेश्वर होन, सतिष आव्हाड, विलासराव माळी, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, बापूसाहेब बारहाते, निवृत्ती बनकर, आप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर परजणे, राजेंद्र कोळपे, सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, उषा संजयराव औताडे, अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, प्रदिपराव नवले, शरद थोरात, निवृत्ती कोळपे, साहेबराव रोहोम, राजेंद्र देशमुख, भिकनराव भागाजी कोळपे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे, चासनळी कार्यकर्ते, ग्रामस्थ आदिंनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष मनेष गाडे यांचा सत्कार केला. सुत्रसंचलन आभार बाळासाहेब वक्ते यांनी मानले.