सातारा/अनिल वीर : तारळे भागात वर्षं कार्यक्रम मुरुड,ता. पाटण येथे बारावे पुष्प भारतीय बौद्ध महासभेचे आदर्श बौद्धाचार्य विजय भंडारे यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयी मार्गदर्शन केले .
आप्पासाहेब भंडारे यांनी प्रास्ताविकपर वर्षावासाचे महत्व विशद केले. बुद्ध पूजा पाठ आदर्श बौद्धाचार्य आनंद भंडारे यांनी केले. भानुदास सावंत ( भारतीय बौद्ध महासभा, विभागीय अध्यक्ष) यांनीही मार्गदर्शन केले.निलेश कांबळे यांनी स्वागत केले. गणेश कांबळे यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास भागातील प्रमुख कार्यकर्ते राजेंद्र सावंत, भीमराव सप्रे, संजय सावंत, जगन्नाथ मोरे, तुकाराम कांबळे,अर्जुन कांबळे तसेच महिला, बाल बालिका, उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.