उरण दि. 23 (विठ्ठल ममताबादे ) : उरण पूर्व विभाग- एस एस सी बॅच 1989 पिरकोन हायस्कूल च्या वतीने दिपावलीच्या शुभदिनी खास संगीत प्रेमीसाठी स्वरा देवेंद्र पाटील प्रस्तूत मराठी अभंग, भक्तीगीत व भावगीतांची सूरेल अशी स्वर मैफिलीचे आयोजन रविवार दि 23 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6 वा – रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा, गोवठणे येथे करण्यात आले होते. या स्वर मैफिलीला संगीत रसिक प्रेषकांचा मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद मिळाला.
स्वर मैफिलित रायगड भूषण देवेंद्र पाटील, वृषाली पाटील, सानीया म्हात्रे रायगड भूषण गणेश प्रसाद गावंड आदी गायकांनी आपली कला सादर करून रसिक प्रेमकांना मंत्रमुग्ध केले. हामॉनियम मिलिंद म्हात्रे, तबला-गिरिश भगत, ताल वादक संचित गावंड , मृदूंग – प्रथमेश पाटील यांनी यावेळी उत्तम वादन करून रसिक प्रेषकांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र ठाकूर, संजीवन ठाकूर यांनी केले. यावेळी उरण पूर्व विभाग एस एस सी बॅच 1989 चे विद्यार्थी, ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.