पैठण तालुका शिक्षक सेवकांची सह.पतसंस्थेची ५६ वी वार्षिक सभा संपन्न
पैठण,दिं.१०.( प्रतिनिधी) : सर्वात जास्त कामे जर कोणाला असतील तर ते शिक्षकांना हे काम देखील इतरांना देण्यात यावे यासाठी हि मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.जिल्हा परिषद शाळेला वाल कंपाउंड साठी निधी उपलब्ध करून दिला आहे.शिक्षकांच्या मेडिकल बिलाचे हक्काचे पैसे मिळाले पाहिजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे.हि गुणवत्ता कायम अशी राहावी यासाठी शिक्षकांनी मन लावून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करावे जिल्ह परिषद नवीन शाळा बांधकाम, किचन शेड, प्रत्येक गावात आता फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे.जिल्हा परिषद शाळेला वाल कंपाउंडसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.2005 मध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना पेन्शन लागु करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.शिक्षकांच्या अजून काही मागण्या असतील त्या सुद्धा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असणार आहेत.टप्प्या टप्प्याने शिक्षकांची कामे मार्गी लावणार असे पैठण तालुका शिक्षक पतसंस्थेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अभिनंदन मंगल कार्यालय पैठण येथे रोहयो व फलोत्पादन तथा पालकमंत्री संदिपान पा.भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.
पैठण तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अमोल पाटील एरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पैठण तालुका शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मुदत ठेव योजना,दाम दुप्पट योजना,शिक्षक आवर्ती ठेव योजना (टी.आर. डी )मासिक प्राप्ती योजना अशा विविध योजनेअंतर्गत ठेविवर द.सा.द. शे.७ टक्के या दराने दरमहा व्याज दिले जाणार असुन संस्थेचे सर्व व्यवहार संगणिकृत असुन दर महिण्यास सभासदांना माहिती मिळते. असे चेअरमन अमोल एरंडे यांनी सांगितले.व तसेच पतसंस्थेचा ५६ वा वार्षिक अहवाल सभासदांसमोर मांडला असुन पतसंस्थेच्या भरभराटीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत असेही चेअरमन अमोल एरंडे यांनी सांगितले.
पैठण तालुका शिक्षक पतसंस्थेच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पतसंस्थेचे सचिव महेश लबडे यांनी ताळेबंद लेखाजोखाचे उपस्थित असलेल्या सभासदांसमोर वाचन केले.यावेळी चेअरमन अमोल एरंडे,,व्हॉ. चेअरमन राम तांगडे ,सचिव महेश लबडे,, खजिनदार प्रविण वाघमोडे, संचालक कैलास मिसाळ, पांडुरंग गोर्डे, अमोल शेळके, आबासाहेब टकले, श्रीकांत कराड, गजानन नेहाले माणिक नल्लेवाड, आजिनाथ दहिफळे, रोहीणी देहाडराय (मिटकर), अमृता भुमरे ( नवथर), शमिम पठाण, शिक्षक शौकत पठाण, लक्ष्मण गलांडे,विशाल तिखे, केंद्रप्रमुख संतोष पवार, राजेंद्र मोरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राम पाटील एरंडे नंदु पठाडे,लक्ष्मण गलांडे, अरुण काळे, बाळासाहेब माने,नंदलाल काळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, माजी नगरसेवक भुषण काका कावसनकर विनोद बोंबले, बळीराम औटे, तुषार पाटील,कृष्णा मापारी, मनोज गायके,माजी सरपंच सतिश शेळके पाटील,माजी उपनगराध्यक्ष शहादेव पाटील लोहारे अदीं सह सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी व सर्व शिक्षक बंधु-भगिनी उपस्थित होते.