देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
देवळाली प्रवरा शहरातील आसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आम्हास प्रेरणा मिळालेली असुन देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या श्री त्रिंबकराज सार्वजनिक वाचनालयाचे माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या यशात मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन सागर खांदे यांनी केले.
देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पोलिस उप निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा प्रशासकिय अधिकारी सुदर्शन जवक यांच्या हस्ते सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्यावेळीं ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या शहराच्या नावलौकिकात भर घाल घालण्यासाठीच माझ्या कडून प्रयत्न करण्यात येतील, प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट आवघड नाही, आपल्या शहरातील स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी वाचनालयाचा आवश्य लाभ घ्यावा.
यावेळी प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक, लेखाधिकारी कपिल भावसार, वसुली विभागाचे तुषार सुपेकर, भास्कर जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहा प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले तर शेवटी नागेश भालेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुरेश चासकर, दिनकर पवार,नानासाहेब टिक्कल, विजय साठे, निवृत्ती खांदे, राजेंद्र कदम, नंदू शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.