उरण दि 24(विठ्ठल ममताबादे ) : कोकणचे युवा नेतृत्व, विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जिल्हा परिषदेचे मराठी शाळा,डाऊर नगर, उरण येथे समाजातील उपेक्षित घटकांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने महिला, पुरुष व लहान मुले उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन उरण युवक तालुका अध्यक्ष कैलास भोईर यांनी केले होते. यावेळेस सुमारे 500 लोकांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण युवक तालुकाध्यक्ष कैलास भोईर हा अतिशय चांगला कार्यकर्ता असून त्याने सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम उरण तालुक्यात राबविले आहेत. उरण तालुक्यात पक्षाची युवक संघटना चांगल्या पद्धतीने त्याने बांधली आहे. मा. अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आगामी होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कैलास भोईर हेच पंचायत समितीचे पक्षाचे उमेदवार असतील. त्यांना पक्षाचा नेहमी पाठिंबा राहील. त्यांच्या पत्नी किंजलताई यांनाही पक्षाचा नेहमी पाठिंबा राहील.असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना तसेच उपस्थित महिला भगिनीं व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भार्गव पाटील, जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार,युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे,सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश कांबळे, सचिन पाटील, राकेश पाटील, चाणजे ग्रामपंचायत सदस्या किंजलताई कैलास भोईर आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुधीर पाटील यांनी केले.