येवला (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून आपण या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचा सर्वांना अभिमान पाहिजे असे प्रतिपादन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी केले.
तालुक्यातील नव्याने पदाधिकारी निवडीची प्रक्रिया चालू असून या अनुषंगाने अंदरसुल येथे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली,यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची मनोगत ऐकून घेतले ते पुढे म्हणाले गट तट करू नका, पक्षाच्या शिस्तीने कामकाज कराअन्यथा पक्ष कोणासाठी थांबणार नाही.समुद्रातून एक लोटा काढला तर समुद्र आटणार नाही,म्हणून कोणीही अविर्भावात राहू नयेअशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिला.
सर्वांनी एकत्रित राहून नव्याने सर्वच धर्माचे कार्यकर्ते जोडा,पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र व राज्याच्या अनेक योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.शासनाच्या या विविध योजनांचा उपेक्षित व दुर्लक्षित समाजाला व कार्यकर्त्यांना त्याचा फायदा करून देण्यासाठी समाजकार्य करा व नव्याने निवडण्यात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबर सर्वांनी काम करा असे शेवटी वाघ म्हणाले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाबासाहेब डमाळे पाटील, मनोज दिवटे,आनंद शिंदे, नानासाहेब लहरे,अमृता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक संतोष केंद्रे यांनी केले तर आभार बाबासाहेब डमाळे पाटील यांनी मानले.
याप्रसंगी बाळासाहेब काळे,दत्ता सानप,राजेंद्र परदेशी,समीर समदडिया, मयूर मेघराज,कुणाल भावसार,बाळासाहेब कुरे, राहणे सर,संतोष मुथा, बाळासाहेब साताळकर, सकाहारी लासुरे,जगदीश पटेल,वृषाल डमाळे,संजय सानप,काका दरेकर, रावसाहेब भागवत, भाऊसाहेब मोरे,संजय भोसले,मच्छिंद्र हाडोळे, राजेंद्र सोनवणे,मंगेश कांबळे, मंगेश शिंदे,प्रकाश आळणे,लक्ष्मण सुराशे, आसाराम देवरे,कार्तिक वल्टे,संतोष जाधव,गणेश गायकवाड,सचिन आहेर, अनिल पवार,दादासाहेब देशमुख,नानासाहेब शेळके, महेश देशमुख,सागर साबळे, गणपत देशमुख,विलास आहेर,मनोज दाभाडे,कृष्णा भरते,दत्तात्रेय काळंके, मनोज कापसे,नितीन कुळधरर,आबा देशमुख, यांच्यासह मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.