शिवसेना उरणच्या वतीने दिवाळी पहाट-संगीतमय कार्यक्रमाने उरणकर नागरिक झाले मंत्रमुग्ध

0

शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांची प्रमुख उपस्थिती

उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )

सोमवार 24 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6:30 वा.दिवाळीच्या पहिल्या पहाटे उरणवासीयांना संगीत नजराणा शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) उरण तर्फे माजी आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या संयोजनातून दिवाळी पहाट या संगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संगीत विशारद कीर्ती रमेश गोंधळी व कुमारी रमेश आसावरी गोंधळी  यांच्या सुमधुर गायनाने उरणकर मंत्रमुग्ध झाले. त्यांना भास्कर म्हात्रे,गिरीश ठाकरे,महेश भाटे,केशव साळवी यांनी साथ देत विविध रागामध्ये बंदिश-भक्तीगीते व भावगीते सादर करून उरणकरांना मंत्रमुग्ध केले. 

या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे,जेष्ठ कार्यकर्ते मनोज पाटील,शहर संघटक दिलीप रहाळकर ,नगरसेवक अतुल ठाकूर,विधी तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील,द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, सुरेखा भोईर, माजी सरपंच जगजीवन नाईक, शाखाप्रमुख सचिन पाटील, रमेश गोंधळी, किरण पाटील व उरणवासी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक सेनेचे महेश गावंड यांनी आभार मानले.एकंदरीत दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here