मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण तर्फे सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप.

0

उरण दि 24(विठ्ठल ममताबादे ) एक दिवाळी  “स्वच्छ उरण सुंदर उरण “ जे करतात , ते उरण नगरपरिषद मधील कंत्राटी कामगार खास त्यांच्यासाठी “मी उरण कर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण” यांनी दिवाळी निमित्त फराळ व भेट वस्तू देऊन दिवाळी साजरी केली.मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण तर्फे उरण नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास एकूण 22 पुरुष आणि 23 महिला उपस्थित होते .  महिलांना नवीन साडी , दिवाळी फराळ पॅकेट , आणि पुरुषांना नवीन वस्त्र आणि दिवाळी पॅकेट देण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगराध्यक्ष सायली ताई म्हात्रे उपस्थित होते. मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरणचे संस्थापक अध्यक्ष विशाल विजय पाटेकर, सदस्य  कौस्तुभ साळुंखे , शौनक समेळ , भद्रेश रावल , बादल म्हात्रे , विकास पाटेकर , अमन शर्मा , निखिल म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.सफाई कर्मचाऱ्यांना फराळ वाटप केल्याबद्दल सफाई कर्मचाऱ्यांनी संस्थेचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here