पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी):पैठणच्या दक्षिण काशीतील प्रसिद्ध असलेल्या नाघघाटावर दि.२० बुधवारी रुषी पंचमी उत्सव भक्ती मय वातावरनात साजरा करण्यात आला भल्या पहाटे पासूनच महिला आणी पुरुष भावीकांनी नाघघाटा वरील गोदावरीत स्नानासाठी गर्दी केली होती
सप्तरुषी सह अनेक रुषीनी मुनींनी नाघघाटावर जप,तप साधना केल्या मुळे या पवीत्र ठिकाणी भाविक नतमस्तक होऊन रुषीच्या,मुनींच्या गुरुंच्या स्मरनार्थ पुरोहितांच्या मंत्र घोषात पूजा अर्चा केली महिलांनी यावेळी भारुडे,भावगीते म्हणली या वेळी भाविकांनी नाघघाटावरील नागेश्वर,इंद्रेश्वर व गणपती दर्शन घेतले