चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होतेय पहाट; पुन्हा जागं होणार लँडर अन् रोव्हर?

0

सातारा : भारताची महत्वकांशी चंद्रमोहिम चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर सर्व जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे. दरम्याना आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पुन्हा एकदा सकाळ होणार आहे. यासोबतच लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे.
22 सप्टेंबरला सूर्याची किरणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचतील. यानंतर इस्रोकडून पुन्हा एकदा लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोघेही सध्या स्लीप मोडमध्ये आहेत. चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यापूर्वी इस्रोने या दोघांना केवळ 14 दिवसांचे काम सोपवले होते, मात्र हे चंद्रावर पोहोचल्यानंतर रात्री संपल्यानंतर हे दोघेही पुन्हा एकदा कामाला सुरुवात करू शकतात, असे सांगण्यात आले होते.

लँडर आणि रोव्हरला जागे करण्यात इस्रोला यश आले तर ते दुहेरी यश ठरणार आहे. हा एकप्रकारे इस्रोसाठी बोनस असणार आहे. लँडर विक्रमने २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर आले आणि १२ दिवस त्याने इस्रोला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्यानंतर रोव्हर स्लीपिंग मोडमध्ये गेले. पृथ्वीच्या १४ दिवसांइतका चंद्रावर एक दिवस आणि रात्र असतो, 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here