सात्रळ माळेवाडी दरोड्यातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

           राहुरी तालुक्यातील सात्रळ माळेवाडी येथे तीन दिवसापूर्वी पडलेल्या दरोड्यातील आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.या दरोड्यातील तीन ही आरोपी बिड जिल्ह्यातील आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगर व राहुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळविले आहे.

यातील आरोपी आष्टी, जिल्हा बीड येथील आहेत.या दरोड्यातील मुद्देमाल पाथर्डी येथिल सोनारास विकल्याचे तपासात निषपन्न झाल्याने पाथर्डी येथील एका सोनारकीचा व्यावसायकास पोलिसांनी आरोपी केले असून तो फरार आहे. सात्रळ माळवाडी येथें दरोड्याच्या गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याचा प्राथमिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ, पो . हवा, जयभाय, पो. ना. कोकाटे, दिपक फुंदे, यांनी सुरू केला होता.

                दरोड्याच्या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपींचे ठसे मिळाले होते.ठसे तज्ञ यांना प्राप्त झालेल्या ठसे जिल्ह्यातीत दरोडे घालणाऱ्या आरोपींशी पडताळणी करुन पाहिली असताना पोलिसांना महत्वाचा धागा मिळाला.हा धागा पकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ यांनी आरोपी निष्पन्न केले.दरोड्यातील आरोपींना आष्टी, बीड येथून शिताफीने अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली आहे.

         दरोड्यातील आरोपी  राम बाजीराव चव्हाण (वय – २२ वर्षे, रा. आष्टी),तुषार हबाजी भोसले  (वय- १९ वर्षे, रा. पिंपरखेड) रियाज बशीर शेख ( वय – ४९ वर्षे, रा- आष्टी) हे तिन हि आरोपी  आष्टी तालुका जि. बिड जिल्हा येथिल आहेत तिघा आरोपिंना अटक केली आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here