पैठण,दिं.२२.(प्रतिनिधी) : एस एम सेहगल फाऊंडेशन व मोझॅक इंडिया फाऊंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने कृषी ज्योती प्रकल्पा अंतर्गत पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी , राजनी, शेकता, ७४ जळगाव येथे शेतकरी कापूस पीक प्रात्यक्षिक मध्ये केलेल्या खतांच्या नियोजन यामुळे पडलेल्या फरकाचा अनुभव शेहगल फाऊंडेशन च्या माध्यमातून शेतकरी स्वतः अनुभवता आहेत .
शेहगल फाऊंडेशन मागील २ वर्षापासून या भागात कापूस, गहू, कांदा ई पिकात प्रात्येकक्षिक करत आहे यासाठी संस्थेचे प्रकल्प प्रमुख योगेश सिंगारे, कृषी तज्ञ शिवाजी काळे , लहू ठोंबरे हे विशेष प्रयत्न करीत आहे.