चंदनाची झाडे चोरल्याप्रकरणी कुरणच्या चौघांवर गुन्हा दाखल

0

संगमनेर :

शेताच्या बांधावरील चंदनाची पाच झाडे तोडुन चोरल्याप्रकरणी तालुक्यातील कुरण येथील चार जणांवर संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

       जब्बार सत्तार शेख रा. कुरण याने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आरोपी जगन्नाथ नाथा माळी, मिराबाई जगन्नाथ माळी, विश्वास जगन्नाथ माळी, राजू जगन्नाथ माळी सर्व रा. कुरण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींनी फिर्यादी जब्बार सत्तार शेख याचे शेतातील ४० हजार रुपये किंमतीची साधारण सात ते आठ वर्षाची आठ फूट असलेली दहा ते बारा इंच जाडी असलेली पाच चंदनाची झाडे तोडून चोरून नेली असल्याची फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ७८८/ २०२२ भा.द.वी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना. धांदवड करत आहेत.

यातील आरोपींनी फिर्यादी जब्बार सत्तार शेख याचे शेतातील ४० हजार रुपये किंमतीची साधारण सात ते आठ वर्षाची आठ फूट असलेली दहा ते बारा इंच जाडी असलेली पाच चंदनाची झाडे तोडून चोरून नेली असल्याची फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ७८८/ २०२२ भा.द.वी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना. धांदवड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here