कोपरगांव :- दि. २५ ऑक्टोंबर
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे कर्मचारी कै. बाळासाहेब दौलतराव वल्टे यांचे रस्ते अपघातात निधन झाले होते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती निर्मला बाळासाहेब शेटे यांना कारखान्यांने न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन उतरविलेल्या अपघात विमा योजनेचा दोन लाख रूपयांचा धनादेश कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते नुकताच वितरीत करण्यांत आला.
बाजीराव जी. सुतार याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विशालदृष्टीकोनातुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्यांचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्व सभासदांसह कामगारांचा प्रत्येकी दोन लाख रूपयांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. अचानक उदभवलेल्या संकटात विम्याची मदत होते. संकट कधीही सांगुन येत नाही. कारखाना व्यवस्थापनाने कै. बाळासाहेब शेटे यांच्या अपघाताची सर्व कागदपत्रे पुर्तता करून न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडे सादर केली त्यातून दोन लाख रूपयांचा धनादेश श्रीमती निर्मला शेटे व गिरीष बाळासाहेब शेटे यांच्याकडे सुपूर्द करण्यांत आला. शेवटी लेखा शाखेचे देवराम देवकर यांनी आभार मानले.
फोटोओळी-कोपरगांव
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे कर्मचारी कै. बाळासाहेब दौलतराव वल्टे यांचे रस्ते अपघातात निधन झाले होते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती निर्मला बाळासाहेब शेटे यांना कारखान्यांने न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन उतरविलेल्या अपघात विमा योजनेचा दोन लाख रूपयांचा धनादेश कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या वितरीत करण्यांत आला.