हमासचा इस्राईलवर हल्ला ; ४० नागरिक ठार

0

तेल अवीव : आज शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी Paletaine पॅलेस्टिनी इस्लामी कट्टरवादी गट Hamas हमासने इस्राइल Israil वर अचानक रॉकेट हल्ला केला . या हल्ल्यामध्ये इस्रायलचे आतापर्यंत ४० नागरिकांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक लोक जखमी झाले असल्याचे इस्रायलच्या सरकारकडून सांगण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की आमच्या शत्रूला कळणारही नाही इतकी याची किंमत मोजावी लागेल .आम्ही युद्धात असून आम्हीच जिंकू .तर या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी निषेध केला असून भारत या प्रसंगी इस्राइल सोबत असल्याचेही म्हटले आहे.

इस्रायल संरक्षण मंत्र्यांनी लष्करातील राखीव सैनिकांनाही तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर इस्रायली लष्कराने प्रत्युत्तरासाठी गाझा पट्टीवर ताबडतोब हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती पाहून आम्ही प्रतिहल्ला करण्याचा इस्रायलने इशारा दिला आहे.

इस्त्रायली लष्कराने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने तब्बल 5 हजार रॉकेट्स डागण्यात आल्याचा हमास या इस्लामी कट्टरतावादी गटाने दावा केला आहे. या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरन वाजले. तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाल्याचंही वृत्त आहे.

पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या हमास गटाची गाझावर सत्ता आहे. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी अनेक पॅलेस्टिनी कट्टरतावादी गाझामधून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले आहेत.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीत 161 जणांचा मृत्यू झाला असून हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिक पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली आहे. शनिवारच्या पहाटेपासूनच इस्रायलवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा हल्ला सुरू झाला आहे. यातील बहुतेक रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात इस्रायलला यश आलं आहे. पण रॉकेट हल्ल्यामुळे या भागात अनेक ठिकाणी आग लागल्याचं दिसत आहे. दुसरीकडे हमासच्या वरिष्ठ कमांडरने आपण इस्रायलवर हल्ल्या केल्याचं सांगितलं आणि सर्व पॅलेस्टिनीं लोकांना एकत्र लढण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, ते इस्रायली नागरिकांचे रक्षण करतील आणि हमासला त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here