कराड उत्तरमधील 62 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली

0

सातारा /मसूर : Karad कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून आ. बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी सुमारे 79 कोटी रूपयांच्या विविध विभागाकडील कामांना मंजुरी मिळवली होती. त्यातील 17 कोटींच्या कामांची स्थगिती उठली होती. त्यानंतर स्थगिती आदेश सरसकट उठविण्यात आल्याने आ. बाळासाहेब पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या 62 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होऊन सदरची कामे प्रत्यक्षात सुरू होणार आहेत. आ. बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याला यश आले आहे.

तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या 79 कोटींच्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्यानंतर आ. पाटील यांनी उच्च न्यायालयात रिटपिटीशन याचिका दाखल केल्या होत्या. त्याचा निकाल आ. मदार पाटील यांच्या बाजूने लागला होता. त्यामधून शासनाने केवळ 17 कोटींच्या कामांची स्थगिती उठवली. तर उर्वरित 62 कोटींच्या कामांवरील स्थगिती कायम होती. त्याविरूध्दही आ. पाटील यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने सुमारे 83 याचिका निकाली काढल्या व निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागला. त्यानंतर शासनाने स्वतंत्र आदेश काढत सरसकट स्थगिती उठवल्याचे म्हटले आहे. या 62 कोटींच्या कामांमध्ये प्रामुख्याने कराड उत्तरमधील रस्ते सुधारणा, लहान व मोठे बंधारे बांधणे, अल्पसंख्याक बहुल विकास योजनेतून विविध गावांतील अल्पसंख्याक वस्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. तर नगरविकास विभागातून कराड शहरासाठीही रस्ते व सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. सदर कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होऊन कामे मार्गी लागणार आहेत. सदरची कामे मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here