पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी जनतेला उद्देशून भाषण केलं. त्यांच्या भाषणातले हे काही ठळक मुद्दे. यूकेचे नवनियुक्त पंतप्रधान म्हणाले, “की मी समोर येणाऱ्या सगळ्या आव्हानांकडे सहृदयतेने आणि सारासार विचार करून तोंड देईन. पुढच्या पिढीला अशा कर्जाखाली ओझ्याखाली वाकवणार नाही जे कर्ज आम्ही स्वतः फेडू शकलो नाही.”
- *देशाला एकजूट करेन पण कृतीने, फक्त बोलणार नाही.
- *तुमच्यासाठी दिवसरात्र काम करेन.
- *आता खरं काम सुरू झालेलं आहे.
- *माझ्या आधीच्या पंतप्रधानांच्या हातून ज्या चुका झाल्या असतील त्या सुधारण्यासाठी मला पक्षाने या पदासाठी निवडलं आहे. या चुका कोणी मुद्दाम केल्या नव्हत्या पण त्या झाल्या हे सत्य आहे.
- *आपण खूप मोठ्या आर्थिक संकटातून जात आहोत.
ऋषी सुनक यांनी माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांचाही उल्लेख केला आणि त्यांचे आभार मानले. “त्यांनी जे काही केलं ते देशाच्या भल्याचा विचार करून केलं. त्यांची इच्छा होती की देशाची आर्थिक घडी नीट बसावी.”
ऋषी सुनक यांनी बोलताना आर्थिक संकटाचाही उल्लेख केला. कोव्हिडमध्ये जे घडलं त्याचे पडसाद अजूनही जाणवत आहेत.
त्यांनी सर्वांत आधी माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांचे आभार मानले. “देश आणि जग अडचणीच्या परिस्थितीत असताना केलेल्या नेतृत्वाबद्दल” त्यांनी लिझ ट्रस यांचे आभार मानले.
सुनक यांनी म्हटलं की, खासदारांच्या समर्थानानंतर आपला गौरव झाल्यासारखं वाटत आहे.
त्यांनी पुढे म्हटलं, “माझं ज्या पक्षावर प्रेम आहे, त्याची सेवा करणं आणि आपल्या देशाचं ऋण परत करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा गौरव आहे.”
मी दिवस-रात्र देशातल्या लोकांसाठी काम करत राहीन, असं आश्वासनही त्यांनी दिलं.