राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष

0

आजचा दिवस

शके १९४५, शोभननाम संवत्सर, भाद्रपद कृष्ण द्वादशी, द्वादशी श्राद्ध, बुधवार, दि. ११ ऑक्टोबर २०२३, द्वादशी श्राध्द, चंद्र – सिंह राशीत, नक्षत्र – मघा सकाळी ८ वा. ४५ मि. पर्यंत नंतर पूर्वा, सुर्योदय- सकाळी ६ वा. ३३ मि. , सुर्यास्त-   सायं. १८ वा. १८ मि. 

नमस्कार आज चंद्र सिंह राशीत रहाणार आहे. आजचा दिवस सायं. ६ पर्यंत चांगला दिवस आहे. आज चंद्र – गुरु त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक, धनु मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर कन्या, मकर व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.

            दैनंदिन राशिभविष्य

मेष  : महत्त्वाचे निर्णय घेण्यास हरकत नाही. बौद्धिक व कला क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल उत्तम राहणार आहे. हितशत्रूवर मात कराल.

वृषभ : दिवस आनंददायी आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे.

मिथुन : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नातेवाईकांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. प्रवासाचे योग येतील. सहलीचा आनंद घ्याल. 

कर्क : व्यवसायात आर्थिक निर्णय घेऊ शकाल. आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम असणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य लाभेल.

सिंह : मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत. कामे मार्गी लागणार आहेत

कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. कामाचा ताण व दगदग राहील. एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.

तुला– विविध लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल.

वृश्‍चिक : कामे यशस्वी झाल्याने आनंदी रहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. हितशत्रूवर मात कराल. सर्वत्र तुमचा प्रभाव राहील. 

धनु  : नवी दिशा सापडणार आहे. कामे मार्गी लागतील. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपेल. मानसिक ताण कमी होईल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतात.

मकर : प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. मानसिक ताण तणावाला सामोरे जावे लागेल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्नरत रहाल. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे.

 मीन : कामे रखडण्याची शक्यता आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. काहींना अनावश्यक खर्च संभवतात. आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत.

आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३०  या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here