देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
42 वा राष्ट्रीय ज्युनियर शूटिंग बॉल स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर महाराष्ट्र संघाने 2-1 ने अंतिम सामन्यात विजय मिळविला.सलग तिसऱ्या वर्षी महिला संघ महाराष्ट्र ज्युनियर संघ राष्ट्रीय स्पर्धेत विजेते ठरला आहे. महाराष्ट्राची कर्णधार तन्वी खजभागे या खेळाडूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तिला गौरविण्यात आले.
भारतीय नेमबाजी महासंघ आणि राजस्थानच्या मान्यतेने शूटिंग बॉल असोसिएशनच्या वतीने सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे पार पडलेल्या 42 वा राष्ट्रीय ज्युनियर शूटिंग बॉल स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, प.बंगाल, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, केरळ, चंदीगड,
उत्तराखंड, दिल्ली, गोवा, मध्य प्रदेश, त्रिपुरा
यासह देशातील जवळपास सर्व राज्यांतील संघानी भाग घेतला. स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा पराभव केला. यजमान राजस्थान संघ उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघासोबतच्या सामन्यातही जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र संघ यांच्यात अंतिम सामना खेळला गेला.या स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत जल्लोष होता. दोन्ही संघांनी 1-1 सेट जिंकला.तिसऱ्या सेट मध्ये दोन्ही संघ १७-१७ असे बरोबरीत होते. शेवटच्या क्षणी उत्तर प्रदेश संघाकडून झालेल्या चुकांचा फायदा महाराष्ट्र संघाने घेतला.हा सेट जिंकला आणि 2-1 असा विजेता ठरला
खेळाडूंच्या यशाबद्दल हौशी शूटिंग बॉल असोसिएशनचे सचिव छत्रपती पुरस्कार प्राप्त विष्णू निकम, कोषाध्यक्ष शकीलुद्दीन काझी, एसबीएफआय सदस्य अतुल निकम, त्र्यंबक राजे अभिनंदन केले.
चौकट
हा विजेता संघ
कर्णधार तन्वी खाजबागे (अमरावती),स्नेहल हजारे (कोल्हापुर), ऋतुजा खाजबागे (अमरावती),नंदिनी बोराडे (कोल्हापुर), प्रज्ञा गडाख (नाशिक), ममता गुळवे (पुणे), गौरी म्हस्के (अमरावती),श्रावणी जाधव (कोल्हापुर),दिव्या इंजयीत (संभाजीनगर),कावेरी संसारे (नाशिक), पायल पेंडीवाल (लातुर),प्रगती गडाख (नाशिक),राखीव तीन खेळाडू मध्ये तेजस्वी कऱ्हे (कोल्हापूर),विदीका पुरंदरे (अमरावती),नौशिना चाँद (पुणे) संघाचे प्रशिक्षक शरद खाजभागे,व्यवस्थापक प्रा. गणेश भांड आहेत. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हाणून महाराष्ट्राची कर्णधार तन्वी खजभागे हिस 11हजार रुपयांचे रोख बक्षिस देवून गौरविण्यात आले.