उरण दि १२(विठ्ठल ममताबादे ) : हिंदयुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान सन २०२३- २०२४ अंतर्गत दि. ११ / १० / २०२३ रोजी स्वच्छता अभियान तपासणी करीता रा. प. रायगड विभागातुन विभाग नियंत्रक दिपक घोडे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी सुहास कांबळे, उप यंत्र अभियंता चेतन देवधर व विभागीय सांख्यिकी अधिकारी श्रीमती. प्रियांका बुधवंत तसेच, रा. प. मुंबई विभागाचे अमोल चौगुले यांच्या गठीत समितीने उरण बसस्थानक व परिसर आगार परिसराची तपासणी केली. सदर तपासणीतवेळी उरण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार रायगड भूषण एल. बी. पाटील व कोकणवाशीय उत्कर्ष संस्था व मेढे ग्रामविकास मंडळ सचिव रविंद्र चव्हाण हजर होते.
त्यावेळी रायगड विभाग नियंत्रक दिपक घोडे व एल. बी. पाटील व चव्हाण यांच्यासोबत सुसंवाद झाला. त्यावेळी रा. प. उरण आगाराविषयी समाधानकारक मत एल बी पाटील व रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यावेळी घोडे यांनी रा. प. महामंडळातर्फे त्यांचे आभार व्यक्त करुन स्वच्छता तपासणीचे कामकाज पुर्ण केले. एल बी पाटील यांनी उरण आगारामार्फत मराठी भाषा गौरव दिन, रा. प. महामंडळाचा वर्धापन दिन, प्रवाशी वाढवा अभियान, इंधन बचत मोहीम यासारख्या लोकोपयोगी मोहीम उरण आगारात राबविल्या जातात. ही बाब प्रवाशी जनतेच्या दृष्टीने अत्यंत मौलिक आहे. असे नमुद केले. तसेच सदर स्वच्छतेमोहीमेमध्ये उरण बसस्थानकाचे सुशोभिकरण व रंगरंगोटीकरीता उरण तालुक्यातील समाजसेवक व द्रोणागीरी सांस्कृतीक व किडा मंडळाचे संस्थापक महादेव घरत यांच्या सौजन्याने आर्थिक योगदान देऊन उरण बस स्थानकाला नवसंजीवणी देऊन प्रवाशी जनतेकरीता मोलाचे योगदान दिले आहे.असे सांगितले.आगारातील आगार व्यवस्थापक सतिश मालचे,अमोल दराडे, सहाय्यक वाहतुक निरीक्षक दिनेश कदम, दि. पी. तारेकर, धनंजय,वाहतुक निरीक्षक पाटील, तानाजी भोईर व रा. प. कर्मचारी यांचे सदर अभियानास मोलाचे सहकार्य लाभले आहे.