अहमदनगर – रयत शिक्षण संस्थेचे, राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘मानसिक आरोग्य जपण्यासाठी युवती पुढील आव्हाने’ या विषयावर आधारित प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर (मानसशास्त्र विभागप्रमुख, अहमदनगर कॉलेज अहमदनगर) यांच्या व्याख्यानाचे आयोजन गुरुवार दिनांक १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी मानसिक आरोग्य म्हणजे काय? याबाबत सविस्तर माहिती दिली. युवतींनी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच युवतींनी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विविध गुणांचा विकास केला पाहिजे. त्यामध्ये स्व-चा शोध घेतला पाहिजे, शारीरिक व मानसिक सुदृढता वाढविली पाहिजे, स्वतःची सक्षमता वाढविली पाहिजे, परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवला पाहिजे, योगा व व्यायाम केला पाहिजे तसेच प्रत्येक युवतीने आर्थिक सक्षम बनले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच युवतींना मानसिक आजार होऊ नये यासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. शंकर थोपटे यांनी महाविद्यालयातील युवतींना मानसिक आरोग्य विषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भूपेंद्र निकाळजे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा. अडसरे व्ही. बी. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ मुंढे बी. एम यांनी व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोरे ए. व्ही. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शुभांगी ठुबे, डॉ. फातिमा आंबेकर यांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.