पैठण,दिं.१५.(प्रतिनिधी):दक्षिण कशितील श्री क्षेत्र Paithan पैठण येथे शहारातील अनेक गल्ल्या मध्ये दिनाक १५, रविवारी भक्तिमय व उत्साही वातावरणामध्ये नवरात्र उत्सवा निमीत्त्याने देवींच्या मूर्तीची घटस्थापना करण्यात आली. पैठण शहरांमधील आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झालेल्या प्राचीन कालिका मंदिरात, रेणुकादेवी मंदिरात, दुर्गा देवी मंदिरात, भद्रकाली मंदिरात,संतोषी माता मंदिरात, गिराजा माता मंदिरात, हमाल गल्ली मंदिरात, भुईवडा मंदिरात व अन्य ठिकाणी विधिवत पूजा अरच्या करून देवीच्या घटस्थापने चा सोहळ्या पार पडला.
नवरात्र निमित्ताने लोकांच्या गर्दीने गजबजलेल्या शिवाजी चौकात पूजेचे सामन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती शिवाजी चौकातून कालिका माता मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून रांगाराहाटी गल्ली येथे घटस्थापना करण्यात आली मिरवणुकीत महील्यानी, मुलींनी, बालगोपाल यांनी पांढरे फेटे घालून भगव्या साडीत फुगड्या खेळल्या, रांगराहट्टी नवरात्र महीला उत्सव समितीच्या वतीने नवरात्रात मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराणा प्रताप चौकातही नवरात्र उत्सव साजरा करण्यात होत आहे.