पक्ष कार्याबरोबरच महिलांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणार -सौ.प्रिया जानवे
सौ.प्रिया जानवे यांनी भारतीय जनता पार्टीचे वीस वर्षांपासून कार्यरत असून सदस्य, सांस्कृतिक अध्यक्ष, उपाध्यक्ष सलग 3 वेळेस संघटन सरचिटणीस पदावर काम केले. तसेच सामाजिक, शैक्षणिक, बचतगट, अशा विविध क्षेत्रात त्यांनी चांगले संघटन उभे केले आहे. त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेत त्यांची अहमदनगर महानगर शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.
निवडीनंतर सौ.प्रिया जानवे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांचे संघटन करुन त्यांच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याचबरोबर कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे. भाजपा प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या विविध योजना संबंधित महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण पुढकार घेत आहोत. आता मिळालेल्या पदाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्न सोडविण्याबरोबरच भारतीय जनता पार्टीचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करु, असे सांगितले.