अहमदनगर : Shrigonda श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील ग.न ५/१ पै व ५/२ मधील दत्तात्रय सोनबा गावडे यांच्या मालकीची रहिवास प्रयोजनार्थ असलेल्या महेश्वर कॉम्प्लेक्स मध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत अधिकृत तक्रार संदीप विष्णू शिंदे यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता करत जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने श्रीगोंदा पारनेर प्रांताधिकारी गणेश भोसले Srigonda Parner District Magistrate हे करत असून तसे त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना व कार्यवाही करण्याचे आदेश देखील दिले आहेत.
श्रीगोंदा प्र.प्रांताधिकारी पद्माकर गायकवाड,तहसीलदार मिलिंद कुलथे, मंडळाधिकारी चौधरी,ग्रामसेवक कवडे,तलाठी सुद्रिक यांनी समक्ष स्थळ पाहणी पंचनामा करून संदीप शिंदे यांनी केलेल्या अनधिकृत बांधकाम बाबत तक्रारीत तथ्य आढळून आले असले तरी देखील त्याबाबतचा लेखी अहवाल सादर न करता, अनधिकृत बांधकामवर कारवाई न करता टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तक्रारदार संदीप शिंदे यांनी श्रीगोंदा पारनेर प्रांताधिकारी गणेश राठोड यांच्याकडे कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर खात्यांतर्गत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच महेश्वर कॉम्प्लेक्स काष्टी मधील अनधिकृत बांधकामवर १५ दिवसात कारवाई करावी अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.