बाभूळगाव : गुणवतेच्या आधारे मिळाले वार्षिक साडेपाच लाखाचे After
येवला, प्रतिनिधी
बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या S N D college एस एन डी.अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह झाला.यावेळी बजाज फायनान्स या नामांकित कंपनीने ३ विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या आधारे निवड केली.
महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्वांगीण सुविधा उपलब्ध केल्या आहे. शिवाय वर्षभरात नामांकित कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह देखील आयोजित केले जातात.या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे,यासाठी विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्रासह विविध कौशल्यांची माहिती,प्रशिक्षण देखील देण्यात येते.याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
नुकतेच बजाज फायनान्स या नामांकित कंपनीने कॅम्पस मुलाखती घेतल्या.यात एमबीएच्या एकूण २२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.सदर ड्राईव्हमध्ये तीन राऊंड झाले. सहभागी विद्यार्थ्यांची पात्रता चाचणी,व्यतिगत व टेक्निकल मुलाखत झाली.एच आर जान्हवी राणे व सीमा वांडाळे यांनी मुलाखती घेतगुणवत्तेच्या आधारे संधी दिली.
अंतिम वर्ष एमबीए विभागाच्या संकेत शिंदे ,कार्तिक महाजन व किशोर घुमरे या विद्यार्थ्यांची निवड झाली असून या सर्वांची नाशिक व मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना वार्षिक ५ लाख ४० हजार पॅकेज देण्यात आले.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे,सचिव लक्ष्मण दराडे यांनी अभिनंदन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एम. यादव,एमबीए विभागप्रमुख प्रा.राहुल थोरात,प्लेसमेंट अधिकारी प्रा.अमित सोलंकी यांनी अभिनंदन करून या विद्यार्थाच्या सत्कार केला.