राहुरीच्या दादासाहेब पवार यांना त्यांच्या घरी स्थानबद्ध केले.
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
गेल्या 53 वर्षा पासुन रखडलेल्या Nilwande Dam निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे अपूर्ण असताना देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा घाट घातला जात आहे. हा त्यांच्या पदाचा अपमान ठरेल केवळ राजकीय स्वार्थासाठी लोकार्पण करून लाभक्षेत्रातील जनतेच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी करू नये? असे आवाहन निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी केल्यानंतर prim Minister Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात विघ्न येवू नये पोलिस प्रशासनाने निळवंडे धरणा संदर्भात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध केले होते.कार्यक्रमा नंतर त्या सर्वांची सुटका करण्यात आली.
निळवंडे धरणाचा सात कोटी रुपयांचा प्रकल्प आजमितीस 5177 कोटींचा रुपयांवर पोहचला आहे.आज पर्यत निळवंडे धरणासाठी 2400 कोटी खर्च करण्यात आला आहे. निळवंडेची अद्याप 2600 ते 2700 कोटी रुपयांची कामे बाकी आहे.कामे पुर्ण होई पर्यंत हा खर्च वाढण्याची शक्यता आहे.असे असताना देखील लोकार्पण घाट घातला जात आहे.असे वक्तव्य प्रसिद्धी माध्यमाद्वारे राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांच्या घरी पहाटेच राहुरी पोलिस ठाण्यातील पो.हे.काँ.ज्ञानदेव गर्जे,उत्तरेश्वर मोराळे,पो.ना. उमेश खेडकर, देविदास कोकाटे आदी पोलिसांनी पवार झोपेत असतानाच त्यांना स्थानबद्ध केल्याची नोटीस बजावून घरासमोर स्थानबद्ध केले.
निळवंडे डाव्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले असली तरी टेल कॅनॉल व इतर शाखा कालव्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. कालव्यांच्या अस्तरीकरणाची कामेही अद्याप सुरू झालेले नाही. गेट व इतर पी डी एन चाऱ्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू असून सर्वेक्षणाचे काम अंतिम झालेले नाही.
निळवंडे उजव्या कालव्याचे मुख्य कालव्यांची कामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. उजव्या कालव्याची वापरायोगी चाचणी पूर्ण झालेली नाही. जोपर्यंत पी डि एन चाऱ्यांची कामे पूर्ण होऊन शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. तोपर्यंत प्रकल्प पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही. प्रकल्पावरील निम्म्याहून अधिक खर्च बाकी आहे.प्रकल्पाच्या कामाचा कालावधी वाढला तर प्रकल्पाचा खर्च 8000 कोटी पर्यंत जाऊ शकतो. प्रकल्पच पुर्ण नसताना लोकार्पणाचा घाट घातला असल्याने लोकार्पण कार्यक्रमात व्यत्यय येवू नये म्हणून जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशाने निळवंडे कृती समितीत कामकरणारे आंदोलक व आजच्या लोकार्पण कार्यक्रमात आंदोलन करुन व्यत्यय आणू शकणाऱ्या आंदोलकांना स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार निळवंडे धरण कृती समितीत काम करणारे आंदोलकांना त्यांच्या घरीच पहाटच्या सुमारास स्थानबद्ध करण्यात आले होते.कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर,राहताअशा तालुक्यातील प्रमुख आंदोलकांना स्थानबद्ध करण्यात आले.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासारख्या केंद्राच्या योजना मधून निळवंडे प्रकल्पासाठी एक रुपयाही मिळालेला नाही.असे असताना लोकार्पण कशाचे करता? लोकार्पण करुन केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचा घाट घातला आहे. अपूर्ण निळवंडे प्रकल्पाचा पंतप्रधान यांच्या सारख्या उच्च पदाच्या नेत्याच्या हस्ते लोकार्पण करुन पंतप्रधान यांचा अपमान यानेत्यांनी केला आहे.पंतप्रधानाची अवहेलना करून स्थानिक नेत्यांनी राजकिय स्वार्थ साधला आहे.असे पवार यांनी सांगितले आहे.