सातारा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा

0

सातारा  : Satara येथील भिमाई भुमीत ६७ वा Dhammachakra Pravartan Day धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे आयोजन विविध कार्यक्रमाने संपन्न झाले. 

       येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रथमतः संयुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ (सातारा) व अनिल मोहिते (पाटण) व धम्मचारी संघादित्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. दिवसभरच विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करीत होते.

शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अनिल वीर यांनी प्रास्ताविक केले.माणिक आढाव,नंदकुमार काळे, ऍड.विजयानंद कांबळे, आबासाहेब दणाने आदींनी स्वागत केले. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक भागवत भोसले यांनी सूत्रसंचालनासह बौद्धाचार्य यांच्या समवेत सामुहीक धम्म वंदना व सुत्त पठण घेण्यात आले.समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.तद्नंतर श्रामनेर संघाच्या प्रमूख उपस्थितीत धम्म शांती संदेश फेरी शहरातून काढण्यात आली.समता सैनिक दलातर्फे पथ संचालन करण्यात आले.शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सर्वच कार्यक्रमात उपासक-उपासिका यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.पुतळा परिसर दिक्षाभूमीची प्रतिकृती म्हणून भीम अनुयायी यांच्या गर्दीमुळे दिवसभर फुलून गेला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरातील सांस्कृतीक सभामंडपात समता सैनिक दलातर्फे धम्मदीक्षा देण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here