आजचा दिवस Today’s Horoscope
शके १९४५, शोभननाम संवत्सर, अश्विन शुक्ल त्रयोदशी, शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर २०२३, चंद्र – मीन राशीत, नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा सकाळी ०९ वा. २५ मि. पर्यंत नंतर रेवती, सुर्योदय- सकाळी ६ वा. ३८ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ०७ मि.
नमस्कार आज चंद्र मीन राशीत रहाणार आहे. आज क्षयतिथी वर्ज्य दिवस आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मकर , कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, सिंह, तुला या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आज आपण निरुत्साही रहाणार आहात. काहींना नैराश्य जाणवेल, तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. अनावश्यक खर्च संभवतात.
वृषभ : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. संततीसौख्य लाभेल. आनंदी रहाल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन: आज तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल, आत्मविश्वास, जिद्द व चिकाटी वाढणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत.
सिंह : काहींना आरोग्यविषयक तक्रारी राहतील. नैराश्य जाणवेल. आज आपण शक्य तितके शान्त रहावे. वाहने जपून चालवावीत.
कन्या : दैनंदिन जीवनात आनंद राहील. मनोबल व उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील.
तुला : काहींचा वेळ वाया जाणार आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. काहींना आराम करावासा वाटेल. निरुत्साह जाणवेल.
वृश्चिक : तुमचा बौध्दिक प्रभाव राहील. निर्णय घेऊ शकाल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिक लाभ होतील.
धनु : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आज आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे.
मकर : जिद्दीने कामे पूर्ण करणार आहात. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. मनोबल उत्तम राहील.
कुंभ : मानसिक ताण तणाव घेऊ नयेत. आनंदी रहावे. प्रवास सुखकर होतील. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. मनोबल उत्तम राहील.
मीन : उत्साही रहाल. मनोबल उत्तम राहील. जिद्द वाढणार आहे. आरोग्य सुधारेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. सौख्य लाभेल.
आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १३ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४