पैठण,दिं.२६. (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित आर्य चाणक्य विद्या मंदिर, पैठण ही उपक्रमशील शाळा म्हणून सर्वदूर परिचित आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शाळेने वर्षातून किमान ११ किल्ल्याची इतिहास जाणून घेण्यासाठी दुर्ग भ्रमंती या ऐतिहासिक उपक्रम घेण्याचे निश्चित केले. त्या उपक्रमाची एक कडी म्हणून पन्हाळा ते विशाल गड पर्यंत ज्या रस्त्याने शिवराय व मावळे चालले त्याच मार्गावर चालून शिवरायांना वंदन केले.किमान ६५किमी अंतर पायी पूर्ण केले.हा अनुभव अत्यंत रोमहर्षक ,प्रेरणादायक असल्याचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी सांगितले.याप्रसंगी पावनखिंड येथील पावनभूमीस वंदन केले.यावेळी रस्त्यावरिल गावात ५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.विशाळगडावरील बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाधी समोर आर्य चाणक्य ग्रुप नतमस्तक झाला.आपल्या दुर्गभ्रमंतीचा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचे ठरवले आहे.
या उपक्रमात स्था. व्य. समितीचे सदस्य अनिल कावसानकर, मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी, विलास खर्डेकर, प्रमोद काकडे, विकास देशमुख,वर्षा पाडळकर,अर्चना गिरवलकर, सतीश आहेर, उज्वला कुटे, सुदाम पोल्हारे, आशुतोष पानगे, सचिन सूर्यनारायण, विनोद सरोदे, अर्जुन कुलकर्णी, मनोज शिंगारे, सुनेजा मठपती, शिवराज धनसुरे अशा एकूण १७ शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते.