देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
Maratha reservation Chain hunger strike सकल मराठा समाजाच्या वतीने जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत साखळी पद्धत उपोषण करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.सोमवार ३० रोजी सकाळी १० वाजता देवळाली प्रवरा बाजारतळावर साखळी उपोषणास सुरूवात केली जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठ्यांसाठी आयोजक आंदोलकांनी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत.तर राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात व उपोषणस्थळी प्रवेश मिळणार नसल्याचे जाहिर केल्याने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील मराठा समाजाने साखळी उपोषणाला व जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी निवेदन देऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृति पुतळयास पुष्पहार अर्पण करुण उपोषणास सुरुवात केली जाणार आहे.
या आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठ्यांसाठी आयोजक आंदोलकांनी जाचक अटी घातल्या असुन अटी मान्य असणाऱ्यांनीच आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक आंदोलकांनी केले आहे.साखळी उपोषणाच्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात व उपोषणस्थळी प्रवेश मिळणार नाही. राजकीय व्यक्ती उपोषणस्थळी आल्यास त्यांचा आंदोलकांनी अपमान केल्यास त्यास आंदोलक जबाबदार राहणार नाही.आंदोलनात सहभागी झालेला मराठी आंदोलनाच्या वेळेत तो कुठल्याही पक्षाचा नसणार आहे. त्याने पक्ष बाजुला ठेवूनच आंदोलनात सहभागी व्हावे.
आंदोलनात सहभागी होताना त्यास प्रिय असणारा पक्ष सोडून यावे लागेल. आरक्षण मिळेपर्यंत आपल्याला पक्ष सोडावा लागेल. कोणत्याही आंदोलकाने स्वतःचा मोठे पणा मिरविण्यासाठी मान सन्मान घेण्यासाठी येऊ नये.आंदोलनात सहभागी व्हायचे असेल तर एक मराठा म्हणून सहभागी व्हावे लागेल. आंदोलना दरम्यान आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तरी कोणीही मराठा आरक्षणात गलिच्छ प्रकार करू नये. आपल्या नेत्याची जाहिरात करण्याचा प्रयत्न करु नये असे प्रकार करणाऱ्या मराठी आंदोलकास आंदोलना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल.
आंदोलकाचे आयोजक सकल मराठा समाज देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील असुन वृत्तपञ प्रतिनिधींनी कोणत्याही मराठ्याच्या नावाचा आंदोलना दरम्यान प्रसिद्धीसाठी वापरु नये.असे आवाहनही यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.