कोची : केरळमधील कोची येथील एका कन्व्हेंशन सेंटरमध्ये आज 29 ऑक्टोबर रोजी सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कलामसेरीमध्ये झालेल्या या दोन स्फोटांमध्ये आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी झाले असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले .
एका व्यक्तीनं येहोवा व्हिटनेस ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याचा माहिती, अतिरिक्त पोलीस महासंचालक अजित कुमार यांनी दिली आहे. पोलिसांना शरण आलेल्या व्यक्तीचं नाव डोमिनिक मार्टिन असून तो स्वतःदेखिल येहोवा समुदायाचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा करून घटनेबाबत माहिती घेतली आहे. पीटीआयच्या हवाल्यानं म्हटलं की, “स्फोटानंतर निर्माण झालेल्या स्थितीवर आणि आगामी पावलांबाबत शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आहे. ” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादविरोधी एनएसजी आणि एनआयएची पथके लगेचच केरळला रवाना करण्याचे आदेशही दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना केरळचे पोलीस महासंचालक शेख दरवेश म्हणाले की सकाळी जवजवळ 9 वाजून 40 मिनिटांजी ज्रमा इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये स्फोट झाला. रविवारी या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता. “इथे येहोवा विटनेस कार्यक्रम सुरू होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि 36 लोकांवर उपचार सुरू आहे. हॉलमध्ये दोन स्फोट झाले आहेत. स्फोटाच्या वेळी हॉलमध्ये दोन हजार लोक होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्वं शक्यता तपासून पाहत आहेत. जे लोक यामागे आहे त्यांना कडक शिक्षा केली जाईल.” “हा स्फोट आईडी डिव्हाईसने केल्याचे प्राथमिक अंदाज आहे. ”