राशिभविष्य!/दिनविशेष /पंचांग

0

आजचा दिवस

शके १९४५, शोभननाम संवत्सर, अश्विन कृष्ण अष्टमी, सोमवार, दि. ६ नोव्हेंबर २०२३,  चंद्र – कर्क राशीत दुपारी १ वा. २२ मि. पर्यन्त नंतर सिंह राशीत, नक्षत्र – आश्लेषा दुपारी १ वा. २२ मि. पर्यंत नंतर मघा, सुर्योदय- सकाळी ६ वा. ४२ मि. , सुर्यास्त-   सायं. १८ वा. ०२ मि. 

नमस्कार आज चंद्र कर्क राशीत दुपारी १ वा. २२ मि. पर्यंत रहात असून नंतर तो सिंह राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज चंद्र – बुध केंद्रयोग व  चंद्र – शनि प्रतियोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र जाणार आहे.

               दैनंदिन राशिभविष्य

मेष : उत्साह व उमेद वाढेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे व गुंतवणूकीची कामे दुपारपूर्वी करावीत.

वृषभ : दुपारपूर्वी प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण कमी राहील. दुपारनंतर मानसिक सौख्य लाभेल.

मिथुन : आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे, महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना प्रवास संभवतो.

कर्क : महत्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहार दुपारनंतर करावेत. आनंदी वार्ता मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

सिंह : कामाचा ताण असणार आहे. दिवसाची सुरुवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत.

कन्या : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास आज नकोत.

तुला : मानसिक ताकद उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आनंदी व आशावादी रहाल.

वृश्चिक : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. दुपारनंतर विशेष उत्साही रहाल.

धनु : मानसिकता सुधारेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल. कामाचा ताण मात्र असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी.

मकर : हितशत्रूवर मात करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो.

कुंभ : दुपारनंतर तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. मनोधैर्य कमी राहील. खर्च वाढतील.

मीन : दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्य जपावे. 

आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here