उरण दि 6(विठ्ठल ममताबादे ) ; विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने कोकणातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा “वसंतस्मृती आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार”उरण तालुक्यातील पाणदिवे गावचे सुपुत्र मनोज पाटील यांना ठाणे येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले .
मनोज पाटील हे सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.आज पर्यंत त्यांनी सामाजिक ,शैक्षणिक ,आरोग्य,क्रीडा व पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे.गेल्या वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचा “क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले होते.मनोज पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे रायगड जिल्हातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,आमदार संजय केळकर आदी मान्यवर अपस्थित होते.