उरण दि ६(विठ्ठल ममताबादे ) :
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेज गव्हाण, ता.पनवेल जि.रायगड.या विद्यालयाचे शिक्षक देवेंद्र काशिनाथ म्हात्रे यांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले गेले. मो. ह.विद्यालय,ठाणे येथे राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे – कोकण पदवीधर आमदार या मान्यवरांच्या हस्ते,भारतीय जनता पार्टी,शिक्षक आघाडी – कोकण विभाग यांच्या वतीने हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
शिक्षक डी.के.म्हात्रे हे रयत शिक्षण संस्थेत गेल्या पंचवीस वर्षां पासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.ते माध्यमिक विभागात इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.इंग्रजी सारखा कठीण विषय सहज सोपा करून शिकविण्याची त्यांची हातोटी आहे.ते एक समाजशील,विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात.त्यांनी विशेष करून क्रीडा व आर.एस.पी.विभागात अनेक उपक्रम राबऊन विद्यार्थी घडविले आहेत.तसेच त्यांचा सामाजिक कार्यातही नेहमी मोठा सहभाग असतो.त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर ,विद्यालयाचे चेअरमन अरूनशेठ भगत,प्राचार्य गोडगे सर,विद्यार्थी व पालक तसेच समजातील विविध घटकातून त्यांचे कौतुक होत आहे.