कोपरगाव : अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे मात्र आठ दिवस उलटून गेले तरी शासन शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत गंभीर नाही असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले .
ऐन दिवाळीच्या सणा अगोदर कोपरगाव सह राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली असून त्यात शेतकऱ्यांच्या पिका बरोबरच शेतीचे मोठे नुकसान झाले. चार महिने कर्ज काढून उभी केलेले मका,सोयाबीन व सर्वच खरिपाच्या पिकाचे अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले मात्र शासन दिवाळीत जगाच्या पोशिंद्याला शंभर रुपयाच्या आनंदाचा शिधा देऊन त्याचे फोटो काढताना आनंद व्यक्त करत आहे.
आठ दिवस उलटून गेले तरी आजून अतिवृष्टी ने शंभर टक्के नुकसान झाले असताना व शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असताना देखील शासन पंचनामा,ई पीक नोंदणी आदी मध्ये वेळ घालीत आहे. ऐन दिवाळीत गुढघा भर पाण्यातून नुकसान झालेली पिके बाहेर काढत होते .त्याच प्रमाणे शेतीतील पिके उध्वस्त झाले असल्याने शेतकऱ्यां बरोबर शेत मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना आजून तरी शासनाने शेतकरी व शेतमजुरांना कोणत्याही प्रकारे मदत केली नाही यावरून शासन मदतीबाबत शासन गंभीर दिसून येत नाही असे या पत्रकात म्हटले आहे.